Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ₹६००० मिळणार; ४ महिन्याचे रखडलेले हप्ते एकत्र येणार? वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana Women get 6000 Rupees: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महिलांना रखडलेले हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

या महिलांना मिळणार ६००० रुपये

रखडलेले ४ हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ३० एप्रिलपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, केवायसीसोबतच ज्या महिलांचे हप्ते रखडले आहेत त्यांना एकत्र पैसे मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरपर्यंत केवायसी करण्यास सांगितले होते. मात्र, केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. या महिलांना चुक दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात आली आबे. महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करता येणार आहे. दरम्यान, केवायसीत चुका झाल्यामुळे अनेक महिलांचा लाभ रखडला आहे.

या महिलांना मिळणार ६००० रुपये (These Women Will Get 6000 Rupees)

केवायसीतील चुकांमुळे महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. डिसेंबरपासूनचे पैसे या महिलांना मिळालेले नाहीत. कारण डिसेंबरचा हप्ता हा जानेवारीत देण्यात आला होता. त्यामुळे चार महिन्याचे रखडलेले पैसे महिलांना एकत्र मिळतील. रखडलेले सर्व लाभ महिलांना देणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता चार महिन्याचे ६००० रुपये एकत्र दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवायसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा लाभ दिला जाणार आहे.

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ (Only These Women Will Get Benefit of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिला निकषात बसत आहेत. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केले आहे. त्यांचा लाभ सुरु आहे भविष्यातदेखील सुरु राहील. फक्त ज्या महिलांची केवायसीत दुरुस्ती बाकी आहे त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.भविष्यात त्यांनाही लाभ दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

Maharashtra News Live Update : वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Bachchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; अधिकृत घोषणा

Pune Train : पुण्याहून नागपूरला जायचं टेन्शन संपलं, समर स्पेशल ट्रेन झाली सुरू; वाचा कुठे थांबणार?

Ready To Wear Blouse : प्रत्येक साडीसाठी नवीन ब्लाउज कशाला? 'या' ५ रंगांचे रेडी-टू-वेअर ब्लाउज खरेदी करा, शिलाईचे पैसे वाचतील

SCROLL FOR NEXT