Ready To Wear Blouse : प्रत्येक साडीसाठी नवीन ब्लाउज कशाला? 'या' ५ रंगांचे रेडी-टू-वेअर ब्लाउज खरेदी करा, शिलाईचे पैसे वाचतील

Shreya Maskar

रेडी-टू-वेअर ब्लाउज

वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची साडी स्टाइल करायच्या असतील तर हे ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज तुमच्याकडे असायलाच पाहिजे. या रंगांचे ब्लाउज एकाद खरेदी केलात तर इतर ब्लाउजच्या शिलाईचे पैसे देखील वाचतील.

Ready-to-Wear Blouses | pinterest

ब्लाउजचे रंग

काळा, पांढरा/आयव्हरी, सोनेरी/शॅम्पेन, मरून/गडद लाल आणि नेव्ही ब्लू हे पाच आवश्यक रेडी-टू-वेअर ब्लाउजचे रंग आहेत. हे रंग सर्व स्किन टोनर शोभून दिसतात.

Blouses colour | pinterest

स्टायलिश लूक

हे न्यूट्रल आणि रिच टोन्स बहुतेक साड्यांसोबत छान दिसतात आणि कोपरापर्यंतच्या बाह्या असलेल्या स्ट्रेचेबल कॉटन, सिल्क किंवा ब्रोकेड फॅब्रिकमध्ये हे खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला आरामदायी फिल होईल.

Stylish Look | pinterest

काळा रंग

काळ्या रंगाच्या साडीसोबत चमकदार रंगांच्या साड्या (लाल, पिवळा, गुलाबी) प्रिंटेड साडी सुंदर दिसतात. गोल गळा किंवा स्टायलिश बॅक-हुक डिझाइन असलेला ४-वे स्ट्रेचेबल कॉटनचा ब्लाउज निवडा.

Color Black | pinterest

पांढरा रंग

पेस्टल शेड्स, चमकदार सिल्क साड्या, कॉटन लिनन आणि फ्लोरल प्रिंट्स साडीवर पांढरा किंवा आयव्हरी रंगाचा ब्लाउज चांगला दिसतो. चिकनकारी स्टाइल ब्लाउज निवडा.

White | pinterest

सोनेरी रंग

सोनेरी रंगांचे ब्लाउज सणासुदीच्या साड्या, गडद हिरवा, मरून आणि गडद निळा रंगावर छान दिसतात. कोपरापर्यंतच्या बाह्या असलेले ब्रोकेड कापड एक शाही लूक देते.

Gold | pinterest

मरून रंग

मरून किंवा गडद लाल रंगांचे ब्लाउज क्रीम, पिवळा, हिरवा आणि पारंपरिक रेशमी साड्यांवर छान दिसतात. तसेच साडीला मॅचिंग ज्वेलरीने लूक पूर्ण करा.

Maroon | pinterest

नेव्ही ब्लू रंग

पेस्टल, चमकदार गुलाबी, पिवळा आणि आधुनिक रेशमी साड्यांवर नेव्ही ब्लू किंवा गडद जांभळा ब्लाउज सुंदर दिसतात.

Navy Blue | pinterest

NEXT : शिलाईचे झंझट नको गं बाई! उन्हाळ्यात साडीवर स्टाइल करा 'हे' ५ रेडी-टू-वेअर ब्लाउज

Ready To Wear Blouse Designs | pinterest
येथे क्लिक करा...