Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना मे महिन्यात मिळणार फक्त ५०० रुपये, कारण काय? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana May Month Installment Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट येत असतात. लाडक्या बहि‍णींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना मे महिन्यात फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.

या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये (Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु काही महिलांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत. इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच जर इतर योजनांमध्ये १५०० रुपयांपेक्षा कमी निधी मिळत असेल तर उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाते.

ज्या महिला नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा लाभ घेतात त्यांना ५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात.त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? (When Will May Month Installment Deposit)

लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यंदाही तेव्हाच पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वप्नात स्वतःचं लग्न पाहण्याचा स्वप्नशास्त्रानुसार काय अर्थ असतो?

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

SCROLL FOR NEXT