Ladki Bahin Yojna SaamTv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी या महिन्यात आधार-बँक अकाउंट लिंक केले तर किती महिन्याचे पैसे येणार ? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आधार आणि बँक अकाउंट लिंक केलेल्या महिलांनाच या महिन्याचे पैसे मिळणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला. या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, ही योजना बंद होणार नसल्याचे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे.या योजनेत फक्त ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे दिले जातात. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करावे. परंतु अजूनही अनेक महिलांनी बँक खाते आणि आधार लिंक केले नाही. ज्या महिलांनी ज्या महिन्यात अर्ज केला. त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे फक्त त्यांचे बँक अकाउंट लिंक असावे. (Ladki bahin yojana update)

आता ज्या महिला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बँक अकाउंट लिंक करणार आहेत.त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. हे पैसे ज्या महिन्यात त्यांनी अर्ज केले आहेत. त्या महिन्यापासून मिळणार आहे. फक्त लाभार्थी महिलांनाच हे पैसे मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरु झाली आहे.

२१०० रुपये कधीपासून?

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले होते. या योजनेत कधीपासून २१०० रुपये मिळणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या योजनेत २१०० रुपये अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT