Ajit Pawar Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार का? अजित पवारांनी एका वाक्यातच सांगितलं

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चा होत आहेत. याबाबत अजित पवारांना स्पष्टच सांगितलं आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत जर महायुती सरकारचा विजय झाला तर महिलांना २१०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. (Ladki Bahin Yojana)

निवडणुकीत महायुती सरकारचा विजय झाला. या विजयाचे सर्वात जास्त श्रेय हे लाडकी बहीण योजनेला दिले गेले आहे. एकीकडे सरकार महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याचे सांगितले जात आहे.

एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. तसेच सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत अजित पवारांनी माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana Criteria Will Change)

अजित पवार (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana)

ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. तेव्हा अजित पवार त्यांना भेटायला गेले होते.यावेळी त्यांना माध्यमांनी लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला होता. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार आहे का?असा प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, काळजीवाहू सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघालास. यामुळे सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी

नगरसेवक, नेते नव्हे तर अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या २ धरणांच्या पातळीत वाढ

डोंबिवलीमध्ये मोठा घोटाळा उघड! जिल्हा परिषदेचा खोटा शिक्का वापरून इमारत ‘कायदेशीर’ दाखवली

Rutuja Bagwe: चिंब भिजलेले रुप सजलेले...; हिरव्या कॉटन साडीत रुतुजा बागवेचा मनमोहक अंदाज

SCROLL FOR NEXT