Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न; १५०० चा हप्ता बंद

Ladki Bahin Yojana Application Verification: लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता जर लाभार्थी महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आता ज्या महिलांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ आता बंद केला जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. यासाठी आता पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) महिलांच्या अर्जांची पडताळणी पाच टप्प्यांमध्ये केली जात आहे. यात आतापर्यंत ज्या महिला दोन योजनांचा लाभ घेत आहे त्यांना आता फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता होणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहि‍णींच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून बाद केले जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फटका बसणार आहे.

लाडकी बहीण योजनेची स्थिती (Ladki Bahin Yojana)

सध्या लाडकी बहीण योजनेत २.५३ कोटी महिला लाभार्थी आहेत.या महिलांच्या लाभाची अपेक्षित रक्कम ३७,९५० कोटी रुपये आहे. बजेटमध्ये ३४००० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार उरलेल्या पैशांसाठी काय करणार असा प्रश्न आता विचारला जात आहे.

याआधी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे त्यांचाही समावेश आहे. त्यानंतर आता उत्पन्न चेक केले जाणार आहे. जर या पडताळणीत तुमचे उत्पन्न जास्त असल्याचे निदर्शनास आले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT