Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: बहिणी लाडक्या पण अंगणवाडी सेविका नावडत्या; कामाचे पैसे थकले

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे मिळत आहेत. परंतु लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र त्यांच्या कामाचे पैसे मिळालेच नाही आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळत आहेत. परंतु आता अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच त्यांचे कामाचे पैसे मिळत नाही आहेत. अंगणवडी सेविकाच आता त्यांच्या कामाच्या मोबदल्यापासून वंचित आहेत.

लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांनी महिलांचे अर्ज भरले होते. सरकारने प्रत्येक अर्जामागे प्रोत्साहन भत्ता म्हणून ५० रुपये देणार असल्याचे सांगितले होते.मात्र, हे पैसे अजूनही मिळाले नाहीत.

अंगणवाडी सेविकांना ७ महिन्यानंतर फक्त अर्धे पैसे मिळाले आहेत. त्यामुळे हा अर्धा निधी मिळण्यासाठीही सात महिने लागण्याची खंत सेविकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महिलांची निराशा झाली आहे.

लाडकी बहीण योजनेला ७ महिने झाले आहेत. या योजनेत आता अंगणवाडी सेविका पूर्ण निधी कधी मिळणार याची वाट पाहत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांनी यासाठी आंदोलन केले होते. गेल्या तीन चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका आपल्या कामाच्या पैशांची मागणी करत आहेत. त्यांना त्यांचा कामाचा मोबदला मिळावा, असं सांगत आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना पूर्ण पैसे कधी मिळणार याकडे लक्ष आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. महिलांच्या अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. चारचाकी वाहन आहे की नाही हे तपासले जाणार आहे. त्यानंतर आयकर, वयाची पडताळणी केली जाणार आहे. महिला इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नाही ना हेदेखील चेक केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT