Ladki Bahin Yojana chatgpt
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ई-केवायसीनंतरही ₹1500 चा हप्ता मिळाला नाही? लाडक्या बहिणींना अदिती तटकरेंनी दिली मोठी खुशखबरी

Aditi Tatkare e-KYC Update : ई-केवायसी पूर्ण करूनही हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांसाठी सरकारने ६ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. अदिती तटकरे यांनी कागदपत्रातील त्रुटी दुरुस्त करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ई केवायसी प्रोसेसमुळे हप्ता न मिळालेल्या पण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

अदिती तटकरे यांनी सांगितलं की, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिली आहे किंवा त्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्यांना त्या दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केलं की, अनेक महिलांनी ई-केवायसी केली असली तरी कागदपत्रातल्या चुका किंवा तांत्रिक अडचणींमुळे त्यांना योजनेचा हप्ता मिळालेला नाही. अशा पात्र महिलांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊ आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, असं आवाहनही त्यांनी केलं.

मंत्री तटकरे यांनी पुढे सांगितलं की, सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पात्र असलेल्या कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतील मासिक आर्थिक मदत वाढवण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेचा हप्ता वाढवायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. तर योग्य वेळी सरकार भूमिका स्पष्ट करेल. याशिवाय त्यांनी दिल्लीतील आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरही माध्यमांसमोर त्यांनी भाष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Wrap : जीमला जाणाऱ्या तरुणाईसाठी पनीरचा पौष्टिक नाश्ता, फक्त २ मिनिटात होईल तयार

Rajgad Fort : राजगड किल्ल्याची 'ही' रहस्ये आजही अनेकांना माहित नाहीत, एकदा वाचाच

Night Dinner: रात्रीच्या जेवणात हे ७ पदार्थ खाताय? त्यामुळेच वाढत असेल तुमचं वजन

Maharashtra News Live Update: अहिरे गावात मध्यरात्री चोरीचा थरार, सहा चोरट्यांचा धुमाकूळ CCTV मध्ये कैद

Rhiya Ahir: आंदोलनातील'त्या' व्हायरल व्हिडीओने रिया अहिरचं टेन्शन वाढवलं, थेट सायबर सेलकडे तक्रार

SCROLL FOR NEXT