Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: आधार - बँक खाते लिंक आहे, तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत? कारण काय? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. जर तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल तरीही तुम्हाला पैसे आले नाहीत तर त्यामागचे कारण काय?

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, निवडणुकीनंतर हे पैसे वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते.लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असावे.

जर तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. परंतु अनेक महिलांचे बँक अकाउंट आणि आधार लिंक असूनही पैसे आले नसल्याचे समोर आले आहे.तर यामागचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Ladki Bahin Yojana News)

लाडकी बहीण योजनेची पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका अटीत बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडथळे येऊ शकतात. परंतु तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील. याचसोबत तुमच्या बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक अकाउंट चेक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT