Shreya Maskar
'लाडकी बहीण योजना' चे पैसे बँकेत जमा होण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक असणे खूप गरजेचे आहे.
तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर समोर दिसणाऱ्या स्क्रीनवर १२ अंकी आधार कार्ड नंबर टाका आणि लॉग-इन करा.
लॉग-इन झाल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो स्क्रीनवर दिसत असणाऱ्या बॉक्समध्ये टाका.
त्यानंतर लॉग-इन या पर्यायावर क्लिक करा.
तेथे तुम्हाल Bank Seeding Status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
यामध्ये तुम्हाला आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल.
यावरून तुम्हाला आधार कार्ड बँक अकाऊंट लिंक आहे का, हे समजेल.