Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! आता या लाडक्या बहिणींचे १५०० रुपये कायमचे बंद; सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेतून विविध जिल्ह्यातून हजारो महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.लाडकी बहीण योजनेचा आता वर्षपूर्ती झाली आहे. या योजनेतून आता जवळपास ८० हजार महिलांचे अर्ज बाद केले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आतापासून १५०० रुपये मिळणार नाहीत. या योजनेत आता हजारो लाडक्या बहि‍णींना फटका बसला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर या निकषांबाहेर जाऊन जर कोणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. दरम्यान, यासाठी पुन्हा पडताळणी सुरु करण्यात आली आहे.

आयकर विभागाकडून महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे.यातून ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये.जालना, नागपूर, यवतमाळमधील अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

जालना (Jalna) जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यात एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते.यातील हजारो महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

नागपूरमधील ३० हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. हे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाले आहेत. या योजनेत लाडक्या बहि‍णींच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.यामध्ये कर भरणारे, सरकारी कर्मचारी असणारे, इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत.

अमरावतीमधील २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते.यवतमाळमधीलदेखील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांना आता इथून पुढे योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT