Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना कधीच मिळणार नाही १५०० रुपये; तुमचंही नाव आहे का? असं करा चेक

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. या योजनेतून काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यांना या योजनेत पैसे मिळणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबवली आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरली.या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांना देण्यात आले आहेत. दरम्यान आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना २-३ महिन्यांपासून पैसे आले नाहीत. याचाच अर्थ असा की या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही लाभ (These Women Dont Get Ladki Bahin Installment)

लाडकी बहीण योजनेत निकषांबाहेर जाऊन ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यामुळे त्यांना यापुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? (Ladki Bahin Yojana Eligibility)

लाडकी बहीण योजनेत अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे. महिला ही सरकारी कर्मचारी नसावी.महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. या नियमांमध्ये बसत असणाऱ्याच महिलांना १५०० रुपये दिले जात आहेत. ज्या महिला या नियमांत बसत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

तुम्हाला पैसे येणार नाही हे कसं ओळखावं?

लाडकी बहीण योजनेतून ९ लाख महिला अपात्र झाल्या आहेत. काही महिलांनी स्वतः हून नावे मागे घेतली आहेत. या महिलांना गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे येत नाही. जर तुम्हालाही पैसे येत नसतील तर तुमचा अर्ज बाद झाला असेल. त्यामुळे तुम्हाला यापुढेही कधीच पैसे येणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही, भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद उफळला

SCROLL FOR NEXT