Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर उजडला, लाडकीला सप्टेंबरचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख समोर

Ladki Bahin Yojana September Month Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरीही सप्टेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत.

Siddhi Hande

ऑक्टोबर महिना सुरु

लाडकीला सप्टेंबरचा हप्ता कधी येणार?

दिवाळीत खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेत आता लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला आहे तरीही सप्टेंबरचे पैसे आले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, लवकरच पैसे खात्यात जमा होऊ शकतात. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, लवकरच मंत्री आदिती तटकरे याबाबत घोषणा करतील.

सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana September Installment Date)

लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर गेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. दरम्यान, सप्टेंबरचा हप्तादेखील पुढे गेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवाळीतदेखील पैसे येऊ शकतात. जर हा हप्ता आणखी लांब गेला तर ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे.

सणाचे औचित्य साधून महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे त्या कालावधीत कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या १५०० रुपयांची वाट पाहत आहेत.

केवायसी केले नाही तर लाभ बंद (LadkI Bahin Yojana KYC Process)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करावी. तुम्ही केवायसी कशी करायला हवी याबाबत स्वतः आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवायसी करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत दोन गटात राडा; दगडफेक करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण

Mumbai Shivaji Park : शिवाजी पार्कवर चिखलाचं साम्राज्य; दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटासमोर आव्हान | VIDEO

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

दुःखद! मुलाची आत्महत्या, १२ तासात बापानेही प्राण सोडले, धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड, बाप-लेकाच्या निधनाने नांदेड हादरलं

Accident: वडिलांच्या अस्थी विसर्जनाला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT