Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? ८ दिवसात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Majhi Ladki Bahin Yojana September Month Installment Date: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, या दिवसात सप्टेंबरच्या हप्त्याबाबत माहिती समोर आली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार?

सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

८ दिवसात होऊ शकते घोषणा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता लांबणीवर गेला होता. त्यानंतर आता सप्टेंबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पुढच्या ८ दिवसात याबाबत घोषणा होऊ शकते.

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, अजूनपर्यंत सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.लवकरच याबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojaa September Month Installment Update)

सप्टेंबर महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो. मागील २-३ महिन्याचे हप्ता लांबणीवर गेले होते. त्यामुळे या महिन्याचा हप्तादेखील पुढे जाण्याची शक्यता आहे.मात्र, याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत माहिती देतात. त्यांनी माहिती दिल्यानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होती.

केवायसीमुळे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार?

सप्टेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, लाडक्या बहि‍णींना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. त्याची प्रोसेसदेखील सुरु झाली. त्यामुळेदेखील हप्ता लांबणीवर जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. या पुढच्या काही दिवसात सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी आशा सर्व महिलांना आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय

लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी महिलांच्या अर्जांची केवायसी केली जाणार आहे. याची प्रोसेस सुरु झाली आहे. यासाठी दोन महिन्यांना वेळदेखील देण्यात आला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी ऑनलाइन प्रोसेस असणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी पूर्ण करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमचा लाभ थांबवला जाईल. तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT