Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? या दिवशी ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Majhi Ladki Bahin Yojana September Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता कधी येणार?

सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार

या दिवशी खात्यात पैसे येण्याची शक्यता

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. लाडक्या बहिणी सप्टेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सप्टेंबरचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.

सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार

सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यात अजूनही सप्टेंबरचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न विचारला विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत आदिती तटकरे स्वतः माहिती देतात. मात्र, अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. ऑगस्टचा हप्तादेखील सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता. त्यामुळे आता या महिन्याचे पैसेदेखील उशिरा जमा होतील.

या दिवशी सप्टेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता

सप्टेंबरच्या हप्त्याबाबत येत्या ४ दिवसात घोषणा व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु अद्याप अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. त्यामुळे कदाचित ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कधीही पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावरच संपूर्ण माहिती समजेल.

सरकारी लाडक्या बहिणींवर कारवाई

लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. आता या महिलांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत. या महिलांकडून जवळपास १५ कोटी रुपयांची वसूली केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News: भंडारा नगरपरिषदेत २०० कोटींचा भ्रष्टाचार; परिणय फुकेंचा गंभीर आरोप|VIDEO

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT