ladki bahin yojana  Saam tv
बिझनेस

Ladki bahin yojana :...तरच 'लाडकी'चा हप्ता बँक खात्यात जमा होणार; महत्वाची माहिती आली समोर, पाहा व्हिडिओ

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा अकरावा हफ्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारनं बोगस लाडक्या बहीणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला.. त्यातच आता मे महिना उलटून गेला तरी लाडक्या बहीणीच्या खात्यात दीड हजारांचा हप्ता जमा झाला नाही... त्यामुळे मे चा हप्ता मिळणार की नाही? या चिंतेनं लाडक्या बहीणींना ग्रासलं असतानाच खुद्द महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहीणींना खूशखबर दिलीय. तसेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यात लाडकीचे पैसे जमा होणार आहे.

मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरु

आधार लिंक असलेल्या बँक खात्यात उद्यापासून हप्ता जमा होणार

लाडक्या बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरु राहणार

राज्य सरकारने अर्जांची काटेकोर पडताळणी सुरु केली आहे. आत्तापर्यंत विविध जिल्ह्यात लाखो अर्ज अपात्र ठरवण्यात आलेत. ही संख्या 50 लाखांच्या घरात जाण्याची चर्चा आहे. मात्र आतापर्यंत किती लाडक्या बहीणी अपात्र ठरल्या आहेत? पाहूयात...

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र

वय 65 वर्षांहून अधिक असल्याने 1.10 लाख महिला अपात्र

चारचाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र

नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने 7.70 लाख महिला अपात्र

सरकारी सेवेत कार्यरत असल्याने 2,652 महिला अपात्र

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र आता दर महिन्याला लाभार्थ्यांची संख्या घटत असल्यानं लाडकींचं टेन्शन वाढलं आहे. दुसरीकडे योजनेचा आर्थिक भार असल्यानं इतर विभागांच्या कामांवर त्याचा परीणाम झालाय. त्यामुळे सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे. गरजू व्यक्तींनाच लाभ देण्याचा सरकारचा उद्देशही त्यामुळे पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Bigg Boss 19: 'मी टीव्हीचा सुपरस्टार आहे...'; बिग बॉसमध्ये नवा वाद, फरहानाला गौरवने सुनावले खडेबोल

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT