Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी, नक्की कोणाला मिळणार लाभ अन् कोणाचा अर्ज होणार बाद?

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका कुटुंबातील फक्त २ दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. जर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर काय कारवाई होणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो. जर दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांचे अर्ज आता बाद केले जाणार आहेत. त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. यासाठी आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु कली आहे. यातून अनेक महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर काय होणार?

जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. फक्त दोनच महिलांना लाभ मिळणार आहे. परंतु आता हा लाभ नक्की कोणत्या महिलेला द्यायचा आणि कोणाचा लाभ बंद करायचा हे कसं ठरवणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान,आता कोणत्या महिलांना लाभ द्यायचा आणि कोणाला नाही, हे ठरवण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखाला देण्यात येणार आहे. मात्र, यामुळे कुटुंबात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंगणवाडी सेविका कशी पडताळणी करणार?

अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहे. या योजनेतून २६ लाख महिला महिला अपात्र असल्याचे समोर आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील अपात्र महिलांच्या घरी जाऊन त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. जसे की, तुमचे वार्षिक उत्पन्न किती, तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नाही ना किंवा त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे का? , असे प्रश्न विचारले जातात. त्यावरुन महिलांना अपात्र ठरवले जाईल. याचसोबत एका कुटुंबातील किती महिला योजनेचा लाभ घेतात याचीही पडताळणी केली जाईल.

किती महिलांचे अर्ज बाद?

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत जवळपास ४२ लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी सरसकट महिलांना पैसे दिले होते. मात्र, आता लाखो महिलांचे अर्ज बाद केले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एकूण १ लाख ४ हजार महिलांचे अर्ज बाद केले आहेत. तर साताऱ्यातील ८४ हजार महिलांचे अर्ज बाद केले आहे. इतर जिल्ह्यांमधील किती महिलांचे अर्ज बाद झालेत याबाबत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा भीषण अपघात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT