Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या पुनर्तपासणीचा श्रीगणेशा, आतापर्यंत काय काय झालं,अन् आता काय? वाचा सविस्तर माहिती

Majhi Ladki Bahin Yojana Verification Process: लाडकी बहीण योजनेतून तब्बल २७ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. महिलांची आतापर्यंत कशी पडताळणी झाली ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे. आता लाडकी बहीण योजनेतून लाखो महिला अपात्र झाल्या आहेत. त्यांच्या अर्जांची आता पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. एकूण २६ लाख ३४ हजार महिलांची पडताळणी होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची पडताळणी करणार आहे. याआधीही एकदा-दोनदा पडताळणी करण्यात आली होती. ही पडताळणी कशी केली होती ते जाणून घ्या.

लाडक्या बहि‍णींची पडताळणी (Ladki Bahin Yojana Verification process)

लाडकी बहीण योजनेची पडताळणी करताना सुरुवातीला चारचाकी वाहन असलेल्या महिलांची तपासणी करण्यात आली. परिवहन विभागाने यासंबंधितचा डेटा उपलब्ध करुन दिला. त्यावरुन अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहन आहे की नाही, हे तपासत होत्या.

यानंतर इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असलेल्या महिलांची यादी काढली. त्यांनाही योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहेत.यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची यादी समोर आली. त्यांना आता पैसे मिळणार आहे.

ही सर्व पडताळणी होत असताना बोगस पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून आता पैसे परत घेतले जाणार आहे. यासाठी प्रोसेस सुरु आहेत. यानंतर वयोगटात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. एका कुटुंबातील किती महिला लाभ घेतात यावरूनही पडताळणी केली गेली. एका कुटुंबातील फक्त २ महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आता अजून २६ लाख महिला अपात्र असल्याचे समोर आले आहे. या महिलांच्या अर्जांची पडताळणी होईपर्यंत त्यांना पैसे मिळणार नाहीत. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला पात्र असतील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : डोंबिवलीत खळबळ; तरुणाने एम्स रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी, लोकांची धावाधाव

Election Commission: तुम्ही सही करा! राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं पाठवला कागद

Pune Crime : पुण्यात खळबळ! वडील चिडले म्हणून १६ वर्षीय मुलानं आयुष्य संपवलं

Nanded News: आईनेच मुलाला झोपडीत बांधून ठेवलं, पाहा VIDEO

शिंदेंच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस; आमदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT