Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Majhi Ladki Bahin Yojana News: तुम्हाला लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. या योजनेची वर्षपूर्ती होत असतानाच सरकारने पोर्टल बंद केलंय.

Girish Nikam

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पोर्टल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नव्यानं पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत. जुलै 2024 मध्ये ज्या महिलांचं वय 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही. तर काही महिलांच्या अर्जामध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही.

पोर्टल बंद, नव्या लाडकींना लाभ नाही?

दुसरीकडे या योजनेचा जून महिन्याचा अकरावा हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. या योजनेची वर्षपूर्ती होत आहे. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती. जुलै 2024 ते मे 2025 या काळात लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांचे 16500 रुपये मिळाले आहेत. मात्र आता पोर्टलच बंद असल्यानं नव्या पात्र बहिणीची अडचण झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोरपणे तपासणी सुरु आहे. शासनाच्या दोन योजनांचा लाभ, चारचाकी असणे, उत्पन्न जास्त असणे असे निकष लावल्यानं लाखो लाडक्या अपात्र ठरल्या आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी असूनही 'लाडकी बहिण' योजनेचा लाभ लाटणाऱ्या सुमारे सव्वा दोन हजार कर्मचाऱ्यांचाही लाभ बंद झाला आहे.

तसंच ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जीआर नुसार 500 रुपये मिळतात. विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी योजनेसाठी नोंदणी न झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT