Ladaki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ८ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा होणार, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana October Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत येत्या काही दिवसात ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकतो.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

येत्या ८ दिवसात लाडकीच्या खात्यात पैसे जमा होणार

ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, लवकरच महिलांना पैसे येणार असल्याचे दिसत आहे. येत्या आठवड्याभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. याबाबत अजून कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाईल.

लाडकीला येत्या ८ दिवसात पैसे येणार (Ladki Bahin Yojana October Installment Come in 8 Days)

लाडकी बहीण योजनेत येत्या ८ दिवसात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढच्या महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल. त्याआधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही. त्यामुळेच महिलांना काही दिवसात पैसे येऊ शकतात. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

लाडकीच्या केवायसीला ब्रेक (Ladki Bahin Yojana eKYC Stopped)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता या योजनेत केवायसी प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत केवायसीला ब्रेक लावण्यात आला आहे. पुढील काही दिवस लाडकी बहीण योजनेत केवायसी स्थगित करण्यात आली आहे. लवकरच ही प्रक्रियादेखील सुरु केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहिणीची आत्महत्या, बहिणीच्या खोलीत आयुष्याचा दोर कापला

Bigg Boss 19: अशनूर आणि अभिषेकवर बिग बॉस नाराज; 'हा' नियम तोडल्यामुळे दिली एविक्शनची शिक्षा

Maharashtra Politics: 'जातीवादाचा एवढा किडा असेल, तर तो...', गोपीचंद पडळकरांचा सांगलीच्या खासदाराला इशारा

PM Awas Yojana : गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; पीएम आवास योजनेचे नव्याने अर्ज सुरू, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT