Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana October Installment Expected Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, आता ऑक्टोबरचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार?

संभाव्य तारीख आली समोर

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे. मात्र, आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिना सुरु होऊन १५ दिवस झाले आहेत तरीही हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. दरम्यान, ऑक्टोबरचा हप्ता या दिवशी येऊ शकतो.

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana October Month Installment)

लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता लवकरच दिला जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात. कदाचित दिवाळीच्या मूहूर्तावर महिलांना पैसे दिले जाऊ शकतात. मात्र, अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र लवकरच आदिती तटकरे याबाबत घोषणा करतील.

या महिलांनाच मिळणार ऑक्टोबरचा हप्ता (Only These Women Will Get October Installment)

लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची पडताळणी सुरु आहे. यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. या पडताळणीतून ज्या महिलांचे अर्ज बाद केले जातील त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता महिलांना केवायसी करणेदेखील अनिवार्य केले आहे. आता सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करावेच लागणार आहे.

केवायसी करण्याची शेवटची तारीख काय? (Ladki Bahin Yojana KYC Update)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केवायसी करण्याची संपूर्ण प्रोसेस आहे. केवायसी करताना अनेकांना अडचणी येत आहेत. आता महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढला आहे. दरम्यान, केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे. तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायची आहे. याचसोबत पूरग्रस्त भागातील महिलांना केवायसी करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

Pav Bhaji Khakhra: घरीच बनवा कुरकुरीत पावभाजी खाकरा; सोपी रेसिपी वाचा

Budget 2026: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे शिक्षण किती?

मुंबईला रवाना होण्यापूर्वी शरद पवारांची अजितदादांच्या अंत्यस्थळाला भेट अन् नजर टाकताच...;

Skin Care: महागडी पार्लर ट्रिटमेंट कशाला? घरच्या घरी तयार केलेला 'हा' फेसपॅक लावा, मिळेल हेल्दी ग्लॉईंग स्किन

SCROLL FOR NEXT