Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: अजूनही eKYC केली नाही,लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana November Installment Update: लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, अजूनही केवायसी न केलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही याबाबत प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

केवायसी न केलेल्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार?

नोव्हेंबरचा हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे.त्यामुळे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचे पैसे कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. अजूनही हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही का असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

अजूनही केवायसी नाही, लाडकीला ₹१५०० मिळणार का? (If KYC Not Done Then Women Will Get November Installment Or Not)

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता महिलांनी ३१ डिसेंबरआधी ईकेवायसी पूर्ण करायचे आहे. या कालावधीतदेखील तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, त्याआधीचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाभार्थी महिलांना मिळणार की फक्त केवायसी केलेल्या महिलांना मिळणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ऑक्टोबरचा हप्ता हा सर्व लाभार्थी महिलांना मिळाला होता. त्यामुळे जोपर्यंत केवायसीची मुदत संपत नाही तोपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच येईल. त्यानंतरच केवायसी न केलेल्या महिलांना लाभ मिळणार की नाही याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाणार? (Ladki Bahin Yojana November Installment Update)

नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. तरीही अद्याप हप्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळेच या महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून हप्ते लांबणीवर जात आहेत. ऑक्टोबरचा हप्तादेखील नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यामुळे नोव्हेंबरचे पैसेदेखील पुढच्या महिन्यात देणार की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज त्र्यंबकेश्वरमध्ये सभा

२८ वर्षाच्या महिला डॉक्टरने ९ व्या मजल्यावरून उडी मारली, महिन्याभरात होणार होतं लग्न, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाची बातमी! बेसिक सॅलरी ₹१८००० वरुन ४४,२८० होण्याची शक्यता

Heavy Rain Alert : राज्यात थंडी ओसरली, 'या' जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार, वाचा हवामान विभागाचा इशारा

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

SCROLL FOR NEXT