Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाहीत ₹४५००

Ladki Bahin Yojana These Women Will not Get 4500 Rupees: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेत काही महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ

या महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा होणार नाही

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या नोव्हेंबरपासूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना आतापर्यंत ऑक्टोबरपर्यंतचे हप्ते देण्यात आले. त्यानंतर आता डिसेंबर महिना संपायला अवघे ३ दिवस उरले आहेत. तरीही हप्ता न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता या योजनेत काही महिलांना लाभ मिळणार नाहीये.

लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याचाही हप्ता एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. ४५०० रुपये महिलांना एकत्र येणारअसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यातील काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

या महिलांना मिळणार नाही ₹४५०० (These Women Will Not Get 4500 Rupees)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही. याचसोबत लाभार्थी महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे.यासाठी शेवटचे ३ दिवस उरले आहेत. दरम्यान, ज्या महिला मुदतीआधी केवायसी करणार नाही त्यांचाही लाभ बंद होणार आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यात अनेक महिलांचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

राज्यातील जवळपास कोट्यवधी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील लाखो महिलांनी अजूनही केवायसी केले नाही. त्यांच्याकडे फक्त काही दिवसांची मुदत आहे. जर महिलांनी त्याआधी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे महामार्गावर सुट्ट्यांमध्ये वाहतूक कोंडी..

Leopard Attack : जंगलात शौचालयाला गेलेल्या तरुणीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, दबक्या पावलाने आला अन्...

Saturday Remedies: शनिवारी करा हे 5 सोपे उपाय, जीवनातील सर्व संकटे होतील दूर

Pune Nagpur Trains: पुणे नागपूरसाठी ३ विशेष रेल्वे, २२ वेळा ये-जा करणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Amitabh Bachchan: 'बायकोला दररोज खोटे बोलावे लागतं'; अमिताभ बच्चनचा KBC वर मजेशीर खुलासा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT