Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा हप्ता 'या' तारखेला येणार; मोठी अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana Next Installment: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

Siddhi Hande

भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते.

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जात होते. विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. त्याआधी महिलांना १५०० रुपये हप्ता दिला जाणार आहे. (Ladki Bahin Yojana)

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दिले जातात.सरकारकडून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात. आतापर्यंत महिलांना ५ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. (Ladki Bahin Yojana Next Installment)

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी झाला. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेट्‍स चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागते.https://testmmmlby.mahaitgov.in/ या वेबसाइटवर जाऊन स्टेट्‍स पाहण्यासाठी ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि रजिस्टर मोबाइल नंबर असे दोन ऑप्शन दिले जातात. त्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरुन कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसेल. (Ladki bahin yojana status check)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT