Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या कामाची बातमी, निकषात न बसणाऱ्या अर्जाबाबत सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक अफवा पसरत आहेत. अपात्र महिलांनी जर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे सांगितले जात होते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत केली जाते. या योजनेबाबत अनेक चर्चा होत आहेत. ज्या महिला अपात्र आहेत. त्यांच्याकडून पैसे परत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र, या योजनेत कोणत्याही महिलांकडून जबरदस्तीने परत घेतले जाणार नसल्याने महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीत धरुन नाहीत, असं महिला व बालविकास विभाग सचिव अनुपकुमार यादव यांनी सांगितले आहे.

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्याचसोबत स्वेच्छेने लाभार्थी रक्कम परत केली आहे. आतापर्यंत हजारो महिलांनी पैसे परत केले आहेत. तसेच ज्या महिलांना पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत अनेक महिला स्वतः सांगत आहेत. अशा महिलांना लाभ देण्यात येणार नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत घेण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असंही त्यांनी सांगितले.(Ladki Bahin Yojana Update)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जात आहे. यामध्ये अपात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. अपात्र महिलांकडून सर्व महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता महिलांकडून पैसे परत घेणार नसल्याचे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

SCROLL FOR NEXT