Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षात मिळणार २१०० रुपये; कधी?जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत १५०० रुपये दिले जात आहेत. नवीन वर्षात लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. जुलै महिन्यापासून ही योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे.

दरम्यान, महिलांना हप्ता वाढवून २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते. या योजनेत आता नवीन वर्षात २१०० रुपये दिले जाणार आहे. मात्र, हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Ladki bahin yojana)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता संक्रातीआधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून कदाचित लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.(Ladki Bahin Yojana New Update)

लाडकी बहीण योजनेत नव्याने १२ लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही, त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले आहे. परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत. तसेच महिलांच्या अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलांनी खोटी माहिती भरुन अर्ज केलेत त्यांना या योजनेत लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Maharashtra Live News Update: संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याचे पालिका आवारात करण्यात आले भूमिपूजन

करोडपती बनायचंय मग PPF मध्ये करा गुंतवणूक; आयुष्यभर दरमहा मिळतील 61,500 पेन्शन

Viral Video: जगातील सर्वात सुंदर व्हिडिओ, मुलाने पहिल्यांदा विमानात बसवलं; माऊलीच्या डोळ्यांतून वाहू लागले सुखाचे अश्रू

SCROLL FOR NEXT