
भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आपार आयडी सुरु केला आहे. आपार आयडीमुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती डिजिटल स्वरुपात ठेवली जाणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
APAAR ID नक्की आहे तरी काय? (What Is APAAR ID)
प्रत्येक विद्यार्थ्याला १२ अंकी युनिक नंबर दिला जाणार आहे. प्री प्रायमरी ते उच्च शिक्षण घेण्यासाठी हा नंबर तुमची ओळख असेल.
तुमच्या सर्व वर्षांची प्रमाणपत्रे, क्रेडिट्स, शिष्यवृत्ती अशा सर्व गोष्टींच्या नोंदी तुम्हाला डिजिटल स्वरुपात ठेवता येणार आहे.
अपार आयडी आणि विद्यार्थ्यांचा आधार नंबर लिंक असतो. त्यामुळे तुमचा अपार नंबर हा युनिक असतो. विद्यार्थ्यांचा अपार आयडी हा डिजी लॉकरची लिंक असतो.डिजीलॉकरमध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र सहज उपलब्ध होणार आहे.
रजिस्ट्रेशन कस करावे? (Apaar ID Registration)
अपार आयडी बनवण्यासाठी शाळांना पालकांची परवानगी घेणे गरजेचे असते.
सर्वप्रथम तुम्हाला डिजीलॉकर खाते तयार करावे लागते.
डिजी लॉकरच्या वेबसाइटला भेट द्या किंवा अॅप डाउनलोड करा.
त्यानंतर साइन अप करा आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर ही माहिती भरा.
त्यानंतर केवायसी पूर्ण करा.
अपार आयडी (What is Apaar ID)
केवायसी पूर्ण झाल्यानंतर डिजी लॉकरच्या वेबसाइटवर जा. त्यानंतर लॉग इन करा.
यानंतर Academic Bank Of Credits वर जा.
त्यानंतर शाळा, युनिव्हर्सिटी, अभ्यासक्रम ही माहिती भरा. यानंतर तुमचा अपार आयडी तयार होईल.
अपार आयडीचे फायदे
अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. त्यांची सर्व शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला शाळा बदलायची असेल किंवा उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर फक्त अपार आयडी सबमिट करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.