Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Ruchika Jadhav

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतेय. कधी या योजनेचा गैरवापर केल्याचं समोर येतंय. तर कधी या योजनेतून महिलांना चांगला लाभ मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. या योजनेतून काही महिलांना या महिन्यात तब्बल ४५०० रुपये मिळाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात तब्बल १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ महिलांना खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर अन्य महिलांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होत आहेत. यातील काही महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे हे पैसे बँकांनी काही चुका केल्याने त्यांच्या खात्यात जमा झालेत का याचं खरं कारण काय याची माहिती आम्ही शोधली आहे.

महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकत्र पैसे मिळाले होते. वेगवेगळ्या तारखांना दोन महिन्यांचे प्रत्येक महिन्यातील १५०० प्रमाणे ३००० रुपये मिळाले होते. यामध्ये काही महिलांचे पैसे बँकाने दंड स्वरुपात कापले देखील होते. ज्या महिलांच्या बँक खात्यात बॅलेंस मिनिमम मेनटेन नव्हता त्यांना दंड आकारण्यात आला होता. त्यामुळे बऱ्याच महिलांनी यावर नाराजी व्यक्त करत तक्रार सुद्धा केली होती.

महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देखील याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यावर महिला आणि बाल विकास खात्याकडून बँकाना सांगण्यात आले की, मिनिमम बॅलेन्स मेनटेन नसलेल्या महिलांच्या खात्यातून पैसे कापू नका. तसेच अन्य कोणतीही कारवाई करू नका. त्यानंतर महिलांना आता दंड स्वरूपात कट केलेले पैसे पुन्हा मिळाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे संतापले; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा

Beed Crime : ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; फरार शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss Grand Finale : 'तौबा-तौबा' अन् 'झापुक झुपूक'ची रंगणार जुगलबंदी; अभिजीत-सूरजचा जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

Durga Ashtami 2024 : नवरात्रीत अष्टमीला बनतोय महासंयोग; 'या' ४ राशी बनणार गडगंज श्रीमंत

Upcoming Marathi Movie 2024: ऑक्टोबर महिन्यात बॉक्स ऑफिसवर चित्रपटांचा गाजावाजा, कोणता चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

SCROLL FOR NEXT