Minister Aditi Tatkare announces final KYC deadline and October installment update under Ladki Bahin Yojana. Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो 'या' तारखेपर्यंत करा e-KYC, मंत्री आदिती तटकरेंनी दिली अखेरची मुदत

eKYC Deadline Extended for Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 2024 पासून करण्यात आलीय. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सरकारनं लाभार्थ्यांना केवायसी करण्यास सांगितलंय.

Bharat Jadhav

  • ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात

  • सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणं आवश्यक

  • आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या बहिणींना केवायसी केली नाही त्यांच्यासाठी आज मंत्री आदिती तटकरेंनी अखेरची मुदत दिली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जारी करण्यासंदर्भात माहिती दिली, त्याचबरोबर त्यांनी केवायसीबाबत अपडेट दिलीय.

आदिती तटकरे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलीय. त्यात त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात पैेसे येतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

ई केवायसी करण्याचं आवाहन

माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या चालू आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. सर्व लाडक्या बहिणींनी १८ नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरे यांनी सांगतिलंय.

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणं आवश्यक करण्यात आलंय. यामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवा असा उद्देश आहे. त्यासाठी विविध मार्ग अवलंबल्यानंतर ई केवायसी सुरु करण्यात आली आहे. ई केवायसी करत असताना महिलांना त्यांचा आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर? 50 टक्क्यांवरील आरक्षणाचा फटका बसणार?

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेची प्रवासावरील कार्यवाही अधिक तीव्र

Tuesday Horoscope: ५ राशींच्या हातात पैसा, काहींना प्रवासातून लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

फोडाफोडीनंतर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत भाजपचा नवा डाव; उमेदवारीत बदल, दिग्गजांना बसणार धक्का

Blood Pressure: थंडी वाढली की रक्तदाबाचा धोका वाढतो, वेळीच व्हा सावध; तज्ज्ञांना महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT