Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana March-April Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शेवटच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

मार्च-एप्रिलचा हप्ता कधी येणार?

या दिवशी खात्यात जमा होऊ शकतात पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता मिळालेला नाही. एप्रिल महिन्याचे १८ दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहे. लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.

लाडक्या बहि‍णींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? (Ladki Bahin Yojana March Installment Date)

लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळीदेखील शेवटच्या दोन आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यात खुशखबरी मिळू शकते.

लाडक्या बहि‍णींना ₹३००० एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana ₹3000 Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. जर असं झालं तर महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. महिलांना डबल खुशखबरी मिळू शकते. मात्र, ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता महिलांना १५०० रुपये की ३००० रुपये येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ (Ladki Bahin Yojane eKYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची तारीख समोर आली आहे. केवायसी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत तुम्हाला केवायसीत दुरुस्ती करायची आहे. त्यानंतरच महिलांना लाभ सुरु राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT