Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी करूनही लाडकींचे पैसे अकडलेत? ₹१५०० कधीपासून मिळणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana Installment Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पैसे मिळत नाहीत. त्यांच्या खात्यावर पैसे कधीपर्यंत जमा होणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Priya More
  • लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

  • ई-केवायसी करूनही पैसे न मिळालेल्या लाडकींना लवकरच पैसे मिळणार

  • सरकारने लाडकींच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याबाबत दिली महत्वाची अपडेट

  • महिला लाभार्थींना लवकरच १५०० रुपये मिळणार

महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३००० रुपये देण्यात आले आहेत. पण अनेक लाभार्थी महिलांना पैसे मिळाले नाहीत ते आपल्या खात्यात पैसे कधी जमा होतील याची वाट पाहत आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांना पैसे येणं बंद झाले आहे. पण काही लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना १५०० रुपये हप्ता आला नाही त्यामुळे ते या पैशांची वाट पाहत आहेत. अशामध्ये महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्याने याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शासकीय स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरू आहेत. येत्या काही दिवसांत पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल. लाडकी बहीण योजनेचे हप्ते जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेतील अनेक महिला लाभार्थ्यांचा निधी कित्येक महिन्यांपासून अडकून पडला आहे. काही प्रकरणांमध्ये तर तब्बल ६ महिने उलटूनही अनेकांना पैसे मिळाले नाहीत. महिला व बालविकास विभागाने सांगितले की, जर एखादी महिला लाभार्थी पात्रतेचे निकष पूर्ण करत असेल तर ती जवळच्या महिला व बालविकास विभागात तक्रार दाखल करू शकते. तिने सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आणि तिच्या प्रकरणावर लवकरच सुनावणी होऊन त्याचे निराकरण केले जाईल.

सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. सरकारने ई-केवायसीच्या प्रक्रियेसाठी अनेक वेळा मुदतवाढ देखील केली होती. यासाठीची अंतिम मुदत ३० एप्रिल देण्यात आली होती. या ईकेवायसी प्रक्रियेनंतर अंदाजे ७०,००० लाभार्थी महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली. काही लाभार्थ्यांचा दावा आहे की, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. असे असूनही त्यांना योजनेअंतर्गत मिळणारी १,५०० रुपये अद्याप मिळत नाहीत. महिला आणि बाल विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ई-केवायसी व्यतिरिक्त, पात्रतेची तपासणी देखील केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT