Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: या महिलांना मिळणार नाहीत २१०० रुपये; कारण काय? जाणून घ्या सविस्तर

Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. महायुती सरकार आल्यानंतर आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले जात होते. आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते. परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना दिले होते.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे. परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana New Update)

मिडिया रिपोर्टनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या काळात काही महिलांच्या अर्जाची छाणणी बाकी होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाणणी पुन्हा सुरु केली जाणार आहे.यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील. त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही, असं सांगण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana Eligibility)

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे (Who Will Not Get Ladki Bahin Yojana Installment)

ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त नाही. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, अशा महिलांनादेखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही.

ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे, अशा महिलादेखील या योजनेसाठी पात्र नाहीत.

ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT