Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जूनचे ₹१५०० कधी येणार? सर्वात मोठी अपडेट आली समोर, आज महिलांना मिळणार खुशखबर

Ladki Bahin Yojana June Installment Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या ₹१५०० हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. १५ ते १८ जुलैदरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता असून, उशीर झाल्यास जून आणि जुलैचे एकत्र ₹३००० मिळू शकतात

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana June installment latest update : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय अशा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील सुमारे दीड कोटी महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जून महिन्याचे रखडलेले १५०० रुपये कधी मिळणार, याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. विभागीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै ते १८ जुलैपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

एकाच वेळी ३००० रुपये मिळण्याची शक्यता!

जर १८ जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर जुलै महिन्याच्या अखेरीस जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात. म्हणजेच, महिलांच्या खात्यात १५०० रुपयांऐवजी थेट ३००० रुपये जमा होऊ शकतात. आज राज्यातील कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशाबाबतचा निर्णय होईल, असे सांगण्यात येतेय. लाडकी बहीण योजनेचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग केल्यानंतर महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात होईल.

मानधनात वाढ होण्याची शक्यता:

या योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. मात्र, केंद्र सरकारच्या एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर ही रक्कम वाढवण्याची शिफारस केली आहे. वाढती महागाई पाहता शासनही यावर सकारात्मक असून, लवकरच ही रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये केली जाण्याची दाट शक्यता आहे.

कोणाला मिळणार पैसे?

ज्या महिलांनी ३० एप्रिलपूर्वी आपली 'ई-केवायसी' (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्या योजनेच्या सर्व अटी पूर्ण करतात, त्यांनाच हा लाभ मिळेल. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत, पेन्शनधारक अथवा करदाता (Income Taxpayer) असेल, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विशाखा राऊत मुंबई महानगर पालिका आयुक्तांच्या भेटीला

Mumbai Politics: मुंबई महापालिकेत भाजपची अंतर्गत धुसफूस; महापौरांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ वक्तव्यावर खलबतं

Free Bus Travel : सरकारची मोठी घोषणा! 'या' महिलांना करता येणार मोफत प्रवास; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सावधान! अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देताय? थेट वडिलांवरच गुन्हा दाखल, मुंबईतील प्रकरणामुळे खळबळ

Sugar Free Tea: साखर न टाकता चहा लागेल गोड! ‘ही’ एक सोपी ट्रिक आजच करून पाहा

SCROLL FOR NEXT