Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या दिवशी जुलैचे ₹१५०० खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana July Month Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता येत्या ८ दिवसांत जमा केला जाईल.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

जुलैचा हप्ता कधी जमा होणार याबाबत माहिती समोर आली आहे

जुलै महिन्याअखेर महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. त्यानंतर आता पुढचा म्हणजे १३वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, येत्या ८ दिवसांतच महिलांच्या खात्यात जुलैचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जुलैअखेर किंवा पुढच्या महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे जमा होतील, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

जुलैचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)

लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. दरम्यान, जूनपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे. जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत हे पैसे दिले जाण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

जुलै महिना संपायला अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दिवसात कधीही खात्यात पैसे जमा होतील. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता लांबणीवर जात आहे किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो. त्यामुळे यावेळीही या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती (Ladki Bahin Yojana 1 Year Complete)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत २ कोटींपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होत आहे. त्यातून अनेक अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

१० लाख महिलांचे अर्ज बाद (Ladki Bahin Yojana 10 Lakh Women Ineligible)

लाडकी बहीण योजनेत जवळपास १० लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत. त्यानंतर आता निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर आता नवीन यादी तयार करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले आहेत. त्यानंतर यादी तयार केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Mumbai : मुंबईकरांनो सावधान ! 26 जुलैला समुद्रात उसळणार मोठ्या लाटा | VIDEO

आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

Kandyachi Bhaji Recipe : झणझणीत कांद्याची भाजी, पोळीसोबत लागेल टेस्टी

Satara Tourism : साताऱ्यात ‘हिडन जेम्स’ शोधताय? मग ही 6 ठिकाणं मिस करू नका!

SCROLL FOR NEXT