बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट! खात्यात जमा होणार १५०० रुपये, आदिती तटकरेंची घोषणा

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट मिळणार आहे. रक्षाबंधनला महिलांना जुलैचा हप्ता मिळणार आहे, आदिती तटकरेंनी याबाबत घोषणा केली आहे.

Siddhi Hande

  • लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार

  • रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

  • आदिती तटकरेंची मोठी घोषणा

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे.त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे.९ ऑगस्ट रोजी लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे.

आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती (Ladki Bahin Yojana July Month Installment Date Announced By Aditi Tatkare)

आदिती तटकरेंची एक्स या अकाउंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनाची भेट.माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे.रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधनच्या दिवशी पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता याबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या लाभासाठी निधीदेखील वितरीत करण्यात आला आहे.

ऑगस्टचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana August Month Installment Update)

लाडक्या बहि‍णींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. फक्त जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता दिला जाईल.

आदिती तटकरे कोण आहेत?

आदिती तटकरे या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहे. आदिती तटकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लाडकी बहीण योजना राबवली जाते.

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी?

लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात?

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Street lights and health: रस्त्यांवरील दिव्यांचा प्रकाश घरात येतोय? स्ट्रीट लाइटमुळे हृदयाच्या समस्या वाढत असल्याचं संशोधनातून समोर

Amravati Airport : मुंबईसाठी उड्डाण पुन्हा सुरु; आठ दिवसांपासून बंद होती विमानसेवा

Manoj jarange patil protest live updates : पंढरपुरातून मराठा आरक्षण आंदोलनकांना मदत

iPhone Battery Hacks: आयफोन यूजर्ससाठी खास ट्रिक! बॅटरी बॅकअप वाढवायचा आहे? करा 'ही' सेटिंग आणि वाचवा बॅटरी

Priya Marathe Death: 'मला वडील नाहीत, माझे वडील बनाल...'; प्रिया मराठेसाठी विजू मानेंची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

SCROLL FOR NEXT