Ladki Bahin Yojana July Instalment Update meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

Ladki Bahin Yojana July Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट आहे. जुलैचा १५०० रुपयांचा हप्ता पुढील आठ दिवसांत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. उशीर झाल्यास थेट ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

Ladki Bahin Yojana July 1500 Instalment date Update : ऑगस्ट महिना सुरू होऊन आता १२ दिवस झाले आहेत, पण लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. जुलै महिन्याचे १५०० रूपये खात्यात कधी जमा होणार? याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिला उत्सुकतेने वाट पाहात आहेत, पण महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ८ दिवसात महिलांच्या खात्यावर जुलै महिन्याचे १५०० रूपये जमा होतील.

जुलै महिन्याच्या हप्त्याची नवी अपडेट (Ladki Bahin July installment Update)

जुलै महिन्याच्या हप्त्याची ज्या पात्र महिला वाट पाहतायेत अखेर त्यांची प्रतिक्षा संपणार असल्याची शक्यता आहे. कारण येत्या ८ दिवसांमध्ये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता असल्याचे वृत समोर आले आहे. पुढच्या आठ दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

जुलैचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारिख (Ladki Bahin July installment Date)

ऑगस्ट महिन्यात विविध सण-समारंभ असल्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही महिलांच्या खात्यात १५ तारखेपासून हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे यंदाही १५ तारखेपर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र जर काही तांत्रिक कारणांमुळे १८ ऑगस्टपर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही तर रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

२०२४ रोजी महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाला एकत्र ३००० रुपये पाठवले होते. यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र करून देण्यात आले होते. यंदा जर वेळेवर पैसे आले नाही तर महिलांच्या खात्यात एकत्र हप्ता येण्याची शक्यता विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. तर जुलैचा हप्ता हा फक्त पात्र महिलांच्याच खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या कालावधीत जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT