Ladki Bahin Yojana meta ai
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर, या आठवड्यात येणार जुलैचा हफ्ता, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट आहे. जुलैचा १५०० रुपयांचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

लाडक्या बहि‍णींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता आठवड्याभरातच महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू आहे. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेसाठी निधी वर्ग करण्याबद्दल निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बैठकीनंतर हप्ता वितरणाबाबत जास्त स्पष्टता मिळू शकते.

लाडक्या बहि‍णींचा हप्ता एकत्र येणार का?

दरम्यान, १७ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाच्या काळात दोन महिन्यांची रक्कम एकत्र मिळून ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही व्यक्त केला जातोय. पण याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

किती महिला अपात्र ठरल्या?

ईकेवायसी प्रोसेसनंतर राज्यातल्या ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, १ कोटी ६६ लाख पात्र महिलांच्या खात्यात जुलैचा हप्ता जमा होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय.

कोणत्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार?

ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी यशस्वी झाली आहे आणि ज्या योजनेच्या सर्व पात्रता निकषांमध्ये बसतात, त्यांना जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र ई-केवायसी अपूर्ण असलेल्या किंवा कागदपत्रांच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी आणि पात्रता स्थिती तपासणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

संडे स्पेशल मशरूम खिमा रेसिपी, सोप्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करा

काँग्रेस नेत्याच्या हत्येने खळबळ; ३ आरोपींना अटक करताच समोर आले धक्कादायक सत्य

Encounter: अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या, आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Nashik Eartquake : नाशिककरांनो काळजी घ्या! पुन्हा बसणार भूकंपाचा धक्का? प्रशासनाने दिला थेट 'हा' इशारा

SCROLL FOR NEXT