Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार जानेवारीचे ₹१५००; तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana January Installment Date: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात लवकरच जानेवारीचा हप्ता जमा केला जाणार आहे. पुढच्या महिन्यात जिल्हापरिषद निवडणूकीआधी महिलांना पैसे मिळू शकतात.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातनी

लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यात मिळणार जानेवारीचा हप्ता

जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर महिला जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आता पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या दिवशी मिळणार जानेवारीचा हप्ता (Ladki Bahin Yojana January Installment Come On These Date)

लाडकी बहीण योजनेत महापालिका निवडणूकीआधी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा केला आहे. त्याआधी मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी महिलांना नोव्हेंबरचा हप्ता दिला होता. त्यामुळे आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे.

जिल्हापरिषदेआधी महिलांना मिळणार ₹१५०० (Ladki Bahin Yojana January 1500 Rupees Installment Come Before ZP Election)

जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ५ फेब्रुवारीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जानेवारीतच महिलांना ३००० रुपये येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने याविरोधात निवडणूक आयोगाला पत्र दिले होते. याबाबत अग्निम पैसे देऊ शकत नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं. त्यानंतर एकच हप्ता दिला होता. आता पुढच्या महिन्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाईल.

या महिलांना मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करण्यास सांगितले होते. केवायसी न केल्यास महिलांना पैसे मिळणार नव्हते. दरम्यान, आता याच महिन्यात अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पुढच्या महिन्यातदेखील केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT