Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नोकरीपण करताय अन् लाडकी बहीण योजनेचा लाभही घेताय? सरकार घेणार अ‍ॅक्शन, वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana Application Verification Process: लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सध्या सुरु आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची तपासणी केली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यावर आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेबाबत गैरसमज करुन घेतला आहे. अडीच लाखा पेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असं त्यांनी सागितलं आहे. दरम्यान, यानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी सध्या केली जात आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांचे उत्पन्नदेखील तपासले जाणार आहे.यामध्ये महिलांच्या पगाराचीदेखील माहिती घेती जाणार आहे. ज्या महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची विविध टप्प्यांमध्ये पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये महिला महाराष्ट्राची रहिवासी आहे की नाही हे तपासले जाणार आहे.यानंतर महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे की नाही ते तपासले जाणार आहे. परिवहन विभाग व अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन ही तपासणी केली गेली आहे.यानंतर आता लाडक्या बहि‍णींचा पगार तपासला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न नियमांपेक्षा जास्त असणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एप्रिल महिन्याचे शेवटचे ८ दिवस उरले आहेत. अजूनपर्यंत एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात हप्ता जमा करु, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर महिलांना पैसे दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅच विनिंग ९७ धावा करताच संजूनं घेतलं विराट-रोहितचं नाव, शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यात काय चाललं होतं?

मुंबईत मिळणार फायनलचे तिकिट; उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत? वाचा संपूर्ण वेळापत्रक

खामेनीची हत्या, पाकिस्तान पेटला, पाकमधील अमेरिकन दूतावासात अग्नितांडव

T20 World Cup: सॅमसनचा वेस्ट इंडीजवर एअरस्ट्राईक! करो या मरो युद्धात भारताचा धमाकेदार विजय, सेमीफाइनलमध्ये दणक्यात एन्ट्री

दादांच्या विमान अपघातावरून संशय बळावला? अपघाताच्या अहवालातील झाडावरून वाद?

SCROLL FOR NEXT