Maharashtra Ladki Bahin Yojana Update february march installment date Saam TV marathi
बिझनेस

Good News : लाडकीच्या खात्यात ₹ ३००० येणार, तारीखही ठरली; पण या महिलांचा लाभ कायमचा बंद, वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana February-March Installment : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट समोर आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे मिळून ३००० रुपये एप्रिलमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Yojana Update february march installment date : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एप्रिल महिन्यात थेट ३ हजार रूपये जमा होणार आहेत. पण काही महिलांचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद होणार आहेत. कुणाच्या खात्यात पैसे येणार, कुणाचा लाभ बंद होणार, याची कारणं काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात..

लाडकीच्या खात्यात ३ हजार एकत्र जमा होणार - Ladki Bahin Yojana ₹3000 payment date April 2026

जानेवारी २०२६ नंतर एकाही लाडक्या बहिणीच्या खात्यात १५०० रूपयांचा लाभ झालेला नाही. पण आता एप्रिल महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ३ हजार जमा होणार आहेत. होय.. फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा (february march installment date Ladki Bahin Yojana) लाभ एकाचवेळी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी सरकारकडून दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे ३ हजार खात्यात कोणत्या तारखेला जमा होणार? Ladki Bahin scheme installment release date April

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी कोट्यवधि रूपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पैसे जमा होतील. मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलच्या आधी सरकारकडून लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ३ हजार रूपये जमा केले जाणार आहेत.

कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० चा लाभ बंद होणार? who will not get Ladki Bahin scheme benefit Maharashtra

राज्य सरकारकडून लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. या काळात अनेक महिलांनी ईकेवायसी केली खरी.. पण त्यामध्ये चुका झाल्या. त्यामुळेच सरकारने चुका दुरूस्त करण्याची अखेरची संधी दिली. ३१ मार्च २०२६ पर्यंत ईकेवायसीमध्ये काही चूक झाली असेल तर दुरूस्त करता येते. आता ३१ मार्चनंतर ज्या महिलांनी ईकेवायसी केलेली नाही, अथवा अपात्र असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. सरकारकडून आलेल्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीनंतर १० एप्रिल ते १५ एप्रिल यादरम्यान लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च, या दोन महिन्यांचा लाभ वितरीत केला जाणार आहे. पण ज्या महिलांची केवायसी झालीच नाही, अथवा ज्यांनी केलीच नाही, त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेत अपात्र कोण ठरणार? काय आहेत अटी? Ladki Bahin eKYC deadline and eligibility rules

लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार, सर्व अर्जांची सरकारकडून पडताळणी करण्यात येत आहे. केंद्र सरकार आणि राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात चारचाकी वाहने असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचीही नावे वगळण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

Jeera Water For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सकाळी प्या जिऱ्याचं पाणी, आठवडाभरातच दिसाल बारीक

Aishwarya Narkar : "बॉलिवूड पेक्षा भारी..."; ऐश्वर्या नारकरचा नवऱ्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहिलात?

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Numb hands after waking up: रात्री झोपेत हाताला मुंग्या येतात? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या यामागील कारणं

SCROLL FOR NEXT