Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात आज येणार खटाखट ३००० रुपये; तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment: लाडकी बहीण योजनेत महिलांना आज ३००० रुपये दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज दिला जाणार आहे.

Siddhi Hande

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आज वितरित केला जाणार आहे. दोन महिन्याचे मिळून एकत्र ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना खूप आनंद झाला आहे.

महिला दिनाचा मूहूर्त साधत राज्य सरकार महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. महिला दिनाआधीच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हावे, या उद्देशाने आजच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवातदेखील झाली आहे. उरलेल्या सर्व महिलांच्या खात्यात आज पैसे जमा होती.

अडीच कोटी महिलांना मिळणार हप्ता

लाडक्या बहि‍णींना ७ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केली होती. या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना ३००० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेतून ९ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. अर्जांची पडताळणी केल्यानंतर या महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे त्यांना योजनेचा हप्ता मिळणार नाही.

२१०० रुपयांचा हप्ता लांबणीवर

लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु आता या अर्थसंकल्पात तरी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. आम्ही लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पात २१०० रुपये देऊ, अशी घोषणा केली आम्ही कधीच केली नाही, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT