Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडक्या बहिणींनी eKYC केलीच नाही, महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहेत. दरम्यान, या योजनेत १४ लाख महिलांनी केवायसी न केल्याची माहिती समोर आलेली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती

१४ लाख महिलांनी केवायसी केलीच नाही

केवायसी न केल्याने महिलांचा लाभ कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाहीये.लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची डेडलाइन आता ३१ डिसेंबर होती. तोपर्यंत लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेत केवायसीमधून महिलांची सर्व माहिती समजणार आहे. यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद केला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला मुदतवाढ देऊनदेखील १४ लाख महिलांनी केवायसी केलीच नाही. आता या महिलांचा लाभ बंद झाला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अटी (Ladki Bahin Yojana Eliibility Criteria)

लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा अडीच कोटी महिलांनी अर्ज घेतला होता. यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला होता. अनेक महिला २१ ते ६५ वयोगटात बसत नव्हत्या. अनेक महिलांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त होते त्यांचा लाभ बंद केला आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनाही पैसे मिळणार नाहीत.

एकाच कुटुंबातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात. तीन ते चार महिलांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांचा लाभ बंद केला आहे. दरम्यान, त्याआधीच १४ लाख महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना पैसे मिळणार नाहीयेत. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

केवायसीमधून महिलांची माहिती मिळणार आहे. यामध्ये महिलांच्या उत्पन्नाबाबतही माहिती मिळणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते ईकेवायसीमधून समजणार आहे. त्यांचा लाभ कायमचा बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळी बोनस जाहीर; खात्यात येणार इतके पैसे

Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT