Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे काही दिवस! लाडक्या बहिणींनो लगेच eKYC करा, अन्यथा मिळणार नाहीत ₹१५००; स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana KYC Process: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, केवायसीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनेत केवायसीची डेडलाइन

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना आता ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधीदेखील दिला होता. १८ सप्टेंबरपासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन आदिती तटकरेंनी केले आहे.

लाडकी बहीण योजना ई केवायसी डेडलाइन (Ladki Bahin Yojana e KYC Deadline)

आता ई केवायसीसाठी फक्त १८ दिवस उरले आहेत.त्यामुळे महिलांना केवायसी करायची आहे.त्यामुळे अजूनही कोणी केवायसी केली नसेल तर लगेच करा. दरम्यान, केवायसीची प्रोसेस आता अधिक सोपी आणि सिंपल केली आहे. दररोज लखो महिला केवायसी करतात. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी केवायसी केली असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे.

लाडकी बहीण योजना केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process)

सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.

यानंतर e-KYC वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली की नाही हे समजेल.

जर केवायसी पूर्ण झाली नसेल तर पुढील प्रोसेस सुरु होईल.

यानंतर लाभार्थ्यांना पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.

यानंतर खाली तुम्हाला जात प्रवर्ग निवडावा लागेल. यानंतर Declaration वर क्लिक करावे लागेल.

यानंतर काही प्रश्न विचारले जातील त्याची योग्य माहिती द्यायची आहे.

यानंतर तुम्हाला Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल. यानंतर तुम्ही केवायसी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT