Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपर्यंत करता येणार E kyc; उरले फक्त काही दिवस

Majhi Ladki Bahin Yojana E kyc Last Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायची आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख काय आहे ते जाणून घ्या.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य

केवायसी करण्याची शेवटची तारीख काय?

सध्या केवायसीला स्थगिती

केवायसी करण्यासाठी मुदत वाढवून देणार का?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ज्या लाडक्या बहि‍णींनी केवायसी केले नाही त्यांनी लवकरात लवकर करावे. लाडकी बहीण योजनेत केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. तुम्हाला दोन महिन्यात केवायसी करायची आहे. दरम्यान, आता केवायसीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने योजनेत केवायसी करण्यास स्थगिती दिली आहे.

ई केवायसीसाठी अडचणी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. ई केवायसी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायची आहे.यासाठी पोर्टलदेखील सुरु केले आहे. दरम्यान, ओटीपी येत नाही यामुळे केवायसी पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे.

केवायसी कधीपर्यंत करावी? (Ladki Bahin Yojana KYC Last Date)

केवायसीबाबत माहिती देताना आदिती तटकरेंनी सांगितले होते की, येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे. १८ सप्टेंबरपासून ही केवायसीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी म्हणजे १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यामुळे महिलांना नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवायसीसाठी मुदतवाढ देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.अजूनही लाखो लाडक्या बहि‍णींचे केवायसी करणे बाकी आहे. त्यामुळे ही प्रोसेस पुन्हा कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने काम करावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT