Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKycला अडचण; पती आणि वडील हयात नसल्यावर काय करावे? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, महिलांच्या पती आणि वडिलांचेही केवायसी करणे अनिवार्य आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास बंद होणार लाभ

महिलांच्या पती किंवा वडिलांचे केवायसी अनिवार्य

पती आणि वडिल हयात नसल्यावर काय करावे?

सरकार काय तोडगा काढणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, लाभार्थी महिलांसोबतच आता त्यांच्या पती किंवा वडिलांचेही केवायसी करणे अनिवार्य केले आहे. ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही अशा महिलांनी काय करायचे, असा प्रश्न आता महिला विचारत आहेत.

ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्या लाडकींनी काय करावे?

लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. मात्र, ही अट आता महिलांसाठी मोठी जाचक ठरली आहे. आता ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही, अशा महिलांचा लाभ बंद होणार की काय असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. आता यावर सरकारकडे काहीतरी उपाय करण्याची मागणी केली जात आहे.

केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्याची प्रोसेस ऑनलाइन आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन फक्त तुमची माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. या प्रोसेससाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे. केवायसी करताना तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. परंतु ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही, अशा महिलांसाठी सरकार लवकरच तोडगा काढेल.

सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात (Ladki Bahin Yojana September Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, हा हप्ता उशिराने जमा झाला आहे. त्यानंतर आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT