Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: केवायसीसाठी उरले ८ दिवस! लाडक्या बहिणींनो हे काम आजच करा, अन्यथा ₹१५०० होतील कायमचे बंद

Ladki Bahin Yojana eKYC Deadline: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करायची आहे. केवायसीमधील दुरुस्ती करण्यासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. त्यामुळे तुम्ही हे काम लगेच करा.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी

केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी उरले शेवटचे ८ दिवस

हे काम आताच करा अन्यथा लाभ होईल कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करायची आहे. केवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तरीही अनेक महिलांनी केवायसी केलेले नाही. ज्या महिसांनी केवायसी केले नाही त्यांचा लाभ बंद झालाच आहे. परंतु केवायसीमध्ये ज्या महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले त्यांचाही लाभ तात्पुरते बंद करण्यात आला आहे. या महिलांना १५०० रुपये मिळत नाही. दरम्यान, या महिलांना केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी शेवटची संधी आहे. या महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी पूर्ण करायची आहे.

उरले शेवटचे ८ दिवस

लाडकी बहीण योजनेत केवायसी दुरुस्तीसाठी शेवटचे ८ दिवस उरले आहेत. जर महिलांनी तोपर्यंत केवायसीमधील चुका सुधारल्या नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.या महिलांना लाभ जानेवारीपासून तात्पुरता बंद करण्यात आला आहे. परंतु केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शेवटची संधी वाया घालू नका. अन्यथा तुम्हाला १५०० रुपयांचा लाभ मिळणार नाही.

अशी करा केवायसी (Ladki Bahin Yojana eKYC Process)

लाडक्या बहिणींनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका दुरुस्त करायच्या आहेत. यासाठी वेबसाइटवर पर्याय देण्यात आला आहे. त्यावर जाऊन तुम्हाला आधार आणि ओटीपी व्हेरिफिकेशन करायचे आहे. यानंतर तुम्हाला योग्य माहिती भरायची आहे. यानंतरच तुमचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. महिलांनी केवायसी केल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतरच पात्र महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल.

रखडलेले हप्ते एकत्र मिळणार (Ladki Bahin Yojana Pending Installment Come Together)

लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुका झालेल्या महिलांनी दुरुस्ती केल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे. या महिलांना रखडलेले हप्ते एकत्र मिळणार आहेत. जानेवारीपासूनचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेच्या अडचणी वाढल्या, दिल्ली पोलिसांकडून अटक; तिहार कारागृहात पाठवले जाणार?

Maharashtra News Live Update: कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम केल्याप्रकरणी FDA चे 6 अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

Famous Actress Pregnant : ५२ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार! बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे PHOTO अन् VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT