लाडकी बहीण योजनेत केवायसीची शेवटची तारीख
केवायसी न केल्यास लाभ होणार बंद
४५ लाख महिलांचे केवायसी अजूनही बाकी
लाडकी बहीण योजनेत नवीन वर्षात अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. नवीन वर्षात अनेक लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे ईकेवायसी. केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची आज शेवटची तारीख आहे.
४५ लाख महिलांचा लाभ बंद होणार? (Ladki Bahin Yojana 45 Lakh Women Benefit Stopped)
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत आज संपणार आहे. मात्,र अद्यापही 45 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.प्रशासनाने आता पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिलाय.त्यामुळे यापुढे महिलांना केवायसी करण्यास मिळणार नाहीये. तुमच्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ असाच सुरु राहील. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ
लाडकी बहीण योजनेत 7 हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांची पगारवाढ रोखण्यासोबतच पैशांची वसुलीही केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना चांगलाच फटका बसणार आहे. त्यामुळे महिलांकडे केवायसी करण्यासाठी अजून काही तास उरले आहेत.
महिलांसोबत वडील किंवा पतीचे केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana Father and Husband KYC Mandatory)
लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांसोबत त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे केवायसी करणे अनिवार्य आहे. याद्वारे तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे. जर तुमचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचा लाभ बंद केला जाईल. दरम्यान, जर पती आणि वडील हयात नसतील तर तुमच्यासाठी केवायसीची दुसरी प्रक्रिया सुरु केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.