Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: वडील-पती हयात नाही, त्या लाडक्या बहि‍णींनी e-KYC कशी करायची? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Ladki Bahin Yojana eKYC Process: लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत नवीन केवायसी प्रोसेस

ज्यांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी निर्णय

केवायसी कशी करायची? स्टेप बाय स्टेप प्रोसेस

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत आता केवायसीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता लाभार्थी महिला ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. दरम्यान, यासाठी वडील किंवा पतीची केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र, ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांनी काय करायचे असा प्रश्न विचारला जात होता. आता त्यांच्यासाठी नवीन केवायसी प्रोसेस सुरु केली आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी नवीन केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana New KYC Process)

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही त्यांच्यासाठी केवायसी प्रोसेसमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता महिलांना वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे. त्यानंतर वडील किंवा पतीचे मृत्यूपत्र, घटस्फोटीत महिलांचे कागदपत्र संबंधित विभागातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे. त्यानंतर सरकार महिलांच्या कागदपत्रांची शहानिशा करेल. यानंतरच लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे. दरम्यान, यासाठीची प्रोसेस जाणून घ्या.

वडील-पती हयात नाही अशा महिलांसाठी केवायसी प्रोसेस (Ladki Bahin Yojana KYC Process For Widow Women)

सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जायचे आहे.

यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर महिलांचा त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आधारशी लिंक नंबरवर ओटीपी येईल तो टाकायचा आहे. यानंतर तुमची स्वतः ची केवायसी पूर्ण होईल.

यानंतर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने जाऊन काही कागदपत्रे सबमिट करायची आहे. पती किंवा वडीलांचे मृत्यूपत्र, घटस्फोटित महिलांचे घटस्फोटाचे कागदपत्र महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

SCROLL FOR NEXT