Aditi Tatkare advice to Ladki Bahin beneficiaries  
बिझनेस

Ladki Bahin Yojana: 1500 रुपयांचं काय करायचं? आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना सांगितली पैशांच्या बचतीची आयडिया

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांना सल्ला दिला आहे. योजनेअंतर्गत मिळणारी १,५०० रुपयांचं काय करायचं याचा सल्ला त्यांनी दिलाय.

Bharat Jadhav

  • लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी बचतीचा सल्ला

  • आदिती तटकरेंचा महिलांना आर्थिक नियोजनाचा सल्ला

  • १५०० रुपयांपैकी काही रक्कम बचत करण्याचे आवाहन

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी राज्याच्या लाडक्या बहिणींना एक कामाचा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील जवळपास १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिलांना लाभ मिळत आहे. या लाडक्या बहिणीना १५०० रुपयांची मदत शासनाद्वारे केली जाते. त्याबाबत अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना सल्ला दिला आहे.

लाडक्या बहिणींनी त्यांना मिळणारे सर्वच १५०० रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, त्यातील काही पैसे बचत करावेत, असा सल्ला आदित्य तटकरेंनी दिला आहे. हा सल्ला देताना त्यांनी एक किस्साही सांगितला. व्यापारी आम्हाला सतत विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार? कारण ज्यावेळी लाडक्या बहिणींना पैसे मिळतात तेव्हा मार्केट गजबजलेलं असतं असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

आदिती तटकरे या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. जिल्ह्यात नव्यानं बांधण्यात आलेल्या महिला आणि बालकल्याण कार्यालयाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यावेळी आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना हा सल्ला दिला. सगळ्या लाभार्थी महिलांना सांगतोय की तुम्हाला मिळणारे 1500 रुपये सगळेच शॉपिंगवर खर्च करू नका. त्याच्यातील शे-पाचशे हे बचत गट किंवा इतर बँका, सोसायटीमध्ये ठेवा, त्याचा योग्य वापर करा.

त्याचा पुढील कालावधीमध्ये तुम्हाला फायदा होईल. महिला खात्यात पैसा आल्यानंतर लगेच ते खर्च करून टाकतात. "शहरातील व्यापारी आम्हाला विचारतात की लाडक्या बहिणींचे पैसे कधी देणार? महिलांपेक्षा व्यापारीच याची जास्त चौकशी करतात. त्यामुळे एकदा मी एका व्यापाऱ्याला विचारलं की, तुमच्या घरातील कुणी लाभार्थी आहे का? त्यावर तो व्यापारी म्हणाला की, ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये गर्दी असते. त्यामुळेच आम्ही सारखं विचारतो की 1500 रुपये कधी मिळणार, असं विचारल्याचं व्यापरी म्हणाल्याचं तटकरेंनी खुलासा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा दणका; शेकडो घरांचे नुकसान, 12 जणांचा मृत्यू

ठाकरे बंधूंचा तिरंगा विजयी जल्लोष, शिवाजी पार्क परिसरात विजयी सभा, Gen Zच्या पाठीशी ठाकरे बंधू

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा नवा डाव, पेपरफुटीवर कठोर कायदा करणार

मुंबई हादरली! भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग|VIDEO

भारताच्या 'गोल्डन क्वीन'ची हॅटट्रिक! मीराबाई चानूनं मिळवलं सलग तिसरं सुवर्ण पदक; कॉमनवेल्थ बनवला नवा विक्रम

SCROLL FOR NEXT