Ladki Bahin Yojana x
बिझनेस

Ladki Bahin Yojana : 410 कोटींचा निधी मंजूर, 'लाडकी'ची दिवाळी गोड होणार? सप्टेंबरचा हप्ता मिळणार

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. कारण सप्टेंबरचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळता करण्यात आलाय. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam, Yash Shirke

Ladki Bahin Yojana News : एकीकडे काटेकोर पडताळणीमुळे लाडकींची संख्या कमी होत असतानाच पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी ४१० कोटी ३० लाख रुपयांच्या निधीला वित्त विभागाने मंजुरी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. या योजनेसाठी विभागाअंतर्गत ३,९६० कोटी इतका निधी मंजूर केला आहे. मात्र या निधीचा वापर करताना काही सूचनाही केल्या आहेत.

सूचना -

निधीचा वापर लाभार्थ्यांसाठीच करावा. महिला व बालविकास विभागानं अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करावी. तसेच उपलब्ध निधीचा वापर हा अनुसूचित जाती आणि जयबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची दक्षता घ्यावी.

दुसरीकडे ज्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यांनाच योजनेचा हफ्ता मिळणार आहे. मात्र योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक लाडकींना त्याचा फटका बसणार आहे. शासनाला या योजनेचा आर्थिक भार पेलवत नाही हे वास्तव असलं मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारेवरची कसरत करत सरकार निधीची तरतूद करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT